Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

'वन डे'तील नव्या बदलांना 'आयसीसी'ची मान्यता

 

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नव्या नियम बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिली आहे. नव्या बदलांमुळे गोलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आयसीसीची वार्षिक बैठक बार्बाडोस येथे पार पडली. या बैठकीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदलांना मान्यता देण्यात आली. आयसीसी क्रिकेट समितीने काही बदल करण्याच्या शिफारसी केल्या होत्या. त्या या बैठकीत आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने स्वीकारल्या. आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवे नियम 5 जुलैपासून लागू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, की एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आम्ही नव्या शिफारसी मागविल्या होत्या. त्यानुसार आलेल्या शिफारसींवर निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमांमुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल राहणार असून, एकदिवसीय क्रिकेट आणखी रोचक होणार आहे.

आयसीसीने नव्याने वन डे क्रिकेटमध्ये केलेले बदल -

1) पहिल्या 10 षटकांमध्ये आता कॅचिंग पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवणे अनिवार्य नाही.

2) 15 ते 40 षटकांमध्ये आता बॅटिंग पॉवरप्ले मिळणार नाही.

3) 41 ते 50 षटकांदरम्यान आता 30 यार्डांच्या सर्कलबाहेर चारऐवजी आता पाच क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी.

4) कोणत्याही नो-बॉलवर आता फलंदाजाला फ्री हिटची संधी देण्यात येईल.