Whats new

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधनानुसार जगातील सर्वात जास्त नोकऱ्या

 

भारतीय रेल्वे आणि लष्करामध्ये सर्वात जास्त भरती होते, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, ही माहिती खरी नाही. वास्तविक आकडेवारी अशी आहे की, एकूण केवळ 27 लाख लोक भारतीय रेल्वे आणि लष्करात कार्यरत आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधनानुसार, सर्वात जास्त नोकऱ्या उपलब्ध करणाऱ्यांमध्ये भारतीय रेल्वे आठव्या स्थानावर आहे. भारतीय रेल्वेत 14 लाख कर्मचारी काम करतात. भारतीय रेल्वेच्या नंतर म्हणजे नवव्या स्थानावर भारतीय लष्कर आहे, जिथे 13 लाख जण काम करतात.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संशोधनानुसार, जगात सर्वात जास्त कर्मचारी भरती आणि नोकऱ्या देतं ते अमेरिकन सुरक्षा विभाग. अमेरिकेच्या सुरक्षा विभागात या घडीला तब्बल 32 लाख कर्मचारी काम करतात.

तर दुसऱ्या स्थानावर 23 लाख लोकांना नोकरी देणारी चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी आहे आणि तिसऱ्या स्थानावर  अमेरिकेची सुपरमार्केट चेन वॉलमार्ट आहे, जी 21 लाख लोकांना नोकरी देते.