Whats new

‘नासा’च्या यानाचा स्फोट

 

अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) यानाचा उड्डाणानंतर काही वेळातच स्फोट झाला. स्पेसएक्स फाल्कन ९ या अवकाशयानाने फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल येथील तळावरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. मात्र, काही वेळातच त्याचा स्फोट झाला. अवकाश स्थानकावर साहित्य घेऊन जाणारे हे मालवाहू यान असल्याने जीवितहानी झाली नाही. उड्डाणातील त्रुटींमुळेच यानाचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता नासाचे निरीक्षक जॉर्ज डीलर यांनी व्यक्त केली.