Whats new

विश्व संस्कृत संमेलनाच्या निमित्ताने

 

१६ वे जागतिक संस्कृत संमेलन थायलंडमधील बँकॉक येथे सुरू होत आहे. पाच दिवसांच्या या संस्कृत संमेलनाचे आयोजन संस्कृत स्टडीज सेंटर, सिल्पकॉन विद्यापीठ, बॅंकॉक आणि आंतरराष्ट्रीय असोसिएशन संस्कृत स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन बँकॉकमधील सिल्पकॉन विद्यापीठ, सुफब रोड, तवीवट्टना येथे होईल.

या संमेलनात वेद-वेदांत, साहित्य, रामायण, महाभारत, पुराण, भाषाशास्त्र, आगम व तंत्र, व्याकरण, बुद्ध व जैनदर्शन, दक्षिण-पूर्व एशियातील संस्कृतची स्थिती, संस्कृत व विज्ञान, योग, आयुर्वेद, इतिहास व कला, माहिती व तंत्रज्ञान, संगणकीय संस्कृत इत्यादी २३ विषयांवर प्रबंध सादर होतील आणि त्यांवर चर्चा होईल. संस्कृत कवी संमेलन आणि पत्राचारद्वारा संस्कृत शिक्षण (डिस्टन्स संस्कृत लर्निंग) या विषयावरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. सॅमनियंग लिअर्मसाय हे या संमेलनाचे सचिव तर डॉ. अमरदिवा लॉकान संमेलनाचे आयोजक आहेत.

या संमेलनासाठी विविध देशांतील प्रतिनिधींसह भारतातील संस्कृत तज्ञ भाग घेणार आहेत. राष्ट्रीय संस्कृत संस्थानम्, संस्कृत भारती, संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असे बरेच विद्वान संमेलनाला हजेरी लावणार आहे. हे सगळे येथे प्रामुख्याने सांगण्याचे कारण म्हणजे जगाला योग व संस्कृत आपल्याच देशाने दिलेली मोठी देणगीच आहे. आपल्या पूर्वजांनीच जगाला योगशिक्षण दिले हे मधल्या काही काळात आम्ही विसरलो होतो. त्यामुळे जगाला पण त्याचा विसर पडला होता. परंतु, संयुक्त राष्ट्र संघटनेनी योगदिनाला मान्यता दिल्यानंतर भारतीय संस्कृतीची ही अमूल्य देणगी पुन्हा एकदा झळाळू लागली आहे.