Whats new

'रेस अक्रॉस अमेरिका'स्पर्धेत नाशिकचे सायकलपटू अव्वल!

 American Sport  

नाशिकचे सायकलपटू डॉक्टर हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन या बंधूंनी अमेरिकेत तिरंगा फडकवला आहे. 'रेस अक्रॉस अमेरिका' ही सायकल शर्यत विक्रमी वेळेत प्रथम क्रमांकानं पूर्ण करण्याचा मान महाजन बंधूंनी मिळवला आहे. अशी कामगिरी बजावणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

टूर द फ्रान्सनंतरची सर्वात अवघड रेस असा रेस अक्रॉस अमेरिकाचा लौकिक आहे. अमेरिकेच्या बारा राज्यांतून जाणारी ही शर्यत एक बाईक एण्ड्युरन्स रेस असून मार्गात सायकलपटूंना वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश, डोंगर अशा वेगवेगळ्या भूप्रदेशाची आव्हानं पेलावी लागली.

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत तीन हजार मैल म्हणजे सुमारे 4 हजार आठशे किलोमीटरचं अंतर पार महाजन बंधूंनी विक्रमी वेळेत पूर्ण केलं आहे.