Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

'सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५'

Celebrity  

अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक पेड १०० सेलिब्रेटींमध्ये समावेश करण्यात आला आहे. यंदाची फोर्ब्स यादी प्रसिद्ध झाली असून, यात अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेद हा अग्रस्थानी आहे. विशेष बाब म्हणजे यात बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान तसेच कोणीच महिला सेलिब्रेटी स्थान पटकावू शकलेली नाही.

फोर्ब्स २०१५च्या यादीनुसार, 'सेलिब्रिटी १०० : द वर्ल्ड टॉप पेड एन्टरटेनर्स २०१५' मध्ये ३० कोटी डॉलर कमाई असलेला मेवेदर हा अग्रस्थानी आहे. तर अमिताभ आणि सलमान हे यादीत ७१व्या स्थानी असून त्यांची कमाई ३.३५ कोटी डॉलर इतकी आहे. ३.२५ कोटी डॉलरची कमाई असलेला अक्षय कुमार ७६व्या स्थानी तर ८२व्या स्थानी असलेल्या धोनीची कमाई ३.१ कोटी डॉलर आहे.

फोर्ब्स यादीत गायिका टेलर स्विफ्ट (८), टेनिसपटू रोजर फेडरर (१६), गायिका बियांसे (२९), किम करदाशियाँ (३३), गोल्फपटू टाइगर वुड्स (३७), अभिनेता टॉम क्रूज (५२), अभिनेता जॉनी डेप (८७) आणि लियोनाडरे डिकैप्रियो (८९) यांचा समावेश आहे.