Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जगातील सर्वात स्वस्त 5 शहरे, जेथे राहणे-खाणे-फिरणे परवडते

cheapest City  

देशातील आर्थिक राजधानी मुंबई देशभरातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते. मात्र, जागतिक पातळीचा विचार करता मुंबई हे जगभरातील सर्वात स्वस्त शहरात पहिल्या पाचात आहे. मुंबई शहर जगभरातील सर्वात स्वस्त 5 वे शहर आहे. एका सर्व्हेच्या रिपोर्टनुसार, जगातील 40 मुख्य पर्यटक देशांत बजेटच्या दृष्टीने फ्रैंडली सिटीमध्ये मुंबई पाचव्या स्थानावर आहे. मुंबईपेक्षा स्वस्त व्हिएतनाम, पोलंडमधील वार्साव, इजिप्तमधील शर्म अल शेख आणि थायलंडमधील बँकॉक शहरे स्वस्त आहेत. हा सर्व्हे ट्रिप ऍडवायजरने केला आहे. रिपोर्टचे नाव ‘2015 ट्रिपलइंडेक्स सिटीज’ असे आहे. हा वार्षिक रिपोर्ट विविध पर्यटक देशांतील खर्चावर आधारित असतो.

तुलना आकडेवारीची...

रिपोर्टनुसार, मुंबईत दोन लोकांना तीन रात्री राहण्यासाठी 53 हजार 911 रुपये खर्च येतो. यात राहण्यासाठी सर्वाधिक 23091 रुपये खर्च येतो. रिपोर्टच्यानुसार मुंबई हनोईपेक्षा 39 टक्के अधिक महागडी आहे. मात्र, टॅक्सी राईडच्या बाबतीत बँकॉक, शर्म अल शेख तथा वर्सावपेक्षा स्वस्त आहे. जर, हनोईत तीन रात्री घालवायच्या असतील तर 46 हजार 645 रूपये खर्च येतो. हे कॅनकनमध्ये तीन रात्री घालवण्यासाठी लागणा-या 1 लाख 28 हजार 627 रुपये पेक्षा तीनपट कमी आहे.

ही आहेत महागडी शहरे- रिपोर्टनुसार, जगातील सर्वात महाग शहरात मेक्सिकोतील कॅनकन शहर आहे. यानंतर स्वित्झरलँडचे ज्यूरिच, अमेरिकेतील न्यूयार्क, ब्रिटनमधील लंडन तर, कॅरेबियन्स शहर पुंता कानाचा नंबर लागतो.