Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कलम ३७७ रद्द होणार, समलिंगी संबंधांना मिळणार मान्यता

Indian Constitution  

भारतात समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारा भारतीय दंड विधानातील कलम ३७७ रद्द होऊ शकतो, असे संकेत कायदामंत्री सदानंद गौडा यांनी दिले आहे. समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या कायद्यावरही विचारविनिमय होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील समलिंगी विवाहांना संमती देणारा कायदा मंजूर झाल्यावर भारतानेही यावर विचार करावा अशी मागणी समलिंगींसाठी काम करणा-या संस्थांकडून होत होती. सोशल मिडीयावरही अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. अमेरिकेनंतर भारतातही अनेक जण याचे समर्थन करत आहेत. राज्यसभेत डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांनी ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासंदर्भात एक विधेयक मांडले आहे, हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून लोकसभेतही विधेयक मंजूर झाल्यास कलम ३७७ चे महत्त्व उरणार नाही असेही गौडा यांनी सांगितले.

भारतीय दंड विधानातील कलम ३७७ नुसार अनैसिर्गक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने भारतात समलिंगी संबंध हा गुन्हा ठरतो. हा कलम रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. गौडा हे दक्षिण कन्नड जिल्ह्यातून संसदेत निवडून आले असून संघाचा या जिल्ह्यावर चांगलाच प्रभाव आहे.