Whats new

इंदरजितसिंग, जॉन्सनची सुवर्णपदकासह ‘हॅट्‌ट्रिक’

indrajit Singh  

आशियाई ग्रांप्री मैदानी स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्यातही सातत्य राखत भारताच्या इंदरजितसिंगने गोळाफेकीत तर जॉन्सनने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची हॅट्‌ट्रिक नोंदविली. भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळविले. पहिल्या टप्प्यात भारतीय अॅथलिट्‌सने दोन सुवर्णपदकांसह आठ; तर दुसऱ्या टप्प्यात तीन सुवर्णपदकांसह दहा पदके मिळवली होती.

दृष्टिक्षेपात भारतीय

इंदरजितसिंग, जिन्सॉन जॉन्सनची सुवर्णपदकाची हॅट्‌ट्रिक

दविंदरसिंगला भालाफेकीत आश्चर्यजनकपणे सुवर्ण

गायत्रीला हर्डल्स शर्यतीत ‘फोटो फिनीश‘मध्ये रौप्य

राजीव, पुवम्माला चारशे मीटरमध्ये रौप्य

अंकित शर्माने लांब उडीत रौप्य राखले

महिला रिले संघाला ब्राँझ