Whats new

संरक्षण कंपनीची जगातील पहिली महिला सीईओ

Mahila CEO  

लॉकहीड मॅरिलिन ह्यूसन यांना वॉल स्ट्रीट जर्नलने जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या महिला सीईओ म्हणून घोषित केले आहे. सर्वात मोठी संरक्षण कंपनी असणाऱ्या लॉकहीड मार्टिनच्या सीईओपदी त्यांची झालेली निवड ही आश्चर्यकारक होती. एखादी महिला संरक्षण क्षेत्रासारख्या जबाबदार कंपनीचे सीईओपद सांभाळणार ही गोष्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना न पटणारी होती. 1954 साली जन्मलेल्या ह्यूसन या 32 वर्ष या कंपनीमध्ये सेवा करत असून, आतापर्यंत त्यांना आठवेळा पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय कंपनीच्या 29 प्रकल्पांमध्ये त्यांनी यशस्वीरीत्या नेतृत्व केले आहे. ह्यूसन यांनी मागील 18 महिन्यातच आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. कंपनीच्या खर्चात कपात करून त्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली, भागभांडवलही वाढविले. पदनियुक्ती झाल्यानंतर देशाच्या अध्यक्षांची आणि खासदारांची त्यांनी भेट घेतली. याशिवाय पेंटागॉनमधील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. अशाप्रकारे ह्यूसन या संरक्षण कंपनीच्या जगातील पहिल्या महिला सीईओ ठरल्या आहेत.