Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

जगभरात प्रसिद्ध असणारे 8 स्टॅच्यू

statue  

जगात असे अनेक स्टॅच्यू आहेत जे आपल्या वैशिष्टय़ांमुळे खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या देशात महात्मा गांधी, नेहरू आणि बोस यांच्याप्रमाणे अनेक महापुरूषांचे स्टॅच्यू लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. मात्र, जगात याशिवाय असे अनेक स्टॅच्यू आहेत, जे फक्त कलेचा उत्तम नमुनाच नाही. तर आपल्याला तोंडात बोट घालण्यास भाग पाडतात.

अशाच काही खास नमुन्यांची एक झलक

मिहाई एमिनेस्क्यू, ओनेस्टी, रोमनिया : रोमचे कवी मिहाई एमिनेस्क्यू यांच्या चेहऱ्याची प्रतिकृती खूपच अनोख्या आणि कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली आहे. झाडांच्या फांद्यांचा वापर करून बनविलेल्या स्कल्चवर त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. सायंकाळी तर हा नजारा पाहण्यासारखा असतो.

100 घोडय़ांची ताकद म्हणजे कॅल्पीस. न्यूयॉर्कमध्ये या स्कल्पचरमध्ये एका डोक्याचे शीर बनविण्यासाठी तब्बल 76 दिवसांचा कालावधी लागला. हा स्टॅच्यू तेथील लोकांची आणि त्यांच्या कम्युनिटीच्या ताकदीचे दर्शन घडवतो. 30 मीटर उंच या दोन घोड्यांचे शीर बनविण्यासाठी स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

8 ते 10 मीटर लांब 50 स्टीलच्या उभ्या रॉड्समध्ये नेल्सन मंडेला यांचा चेहरा दिसतो. लेझर कट 50 स्टील रॉड्स नेल्सन मंडेला यांच्या 50 वर्षांचा संघर्षाची गोष्ट याद्वारे मांडण्यात आली आहे.

बेल्जियमचे हे स्कल्पचर खरचं खूप गजब आणि फनी आहे. या स्कल्पचरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय एका माणसाने धरून ठेवला आहे. या स्टॅच्यूसाठी ब्रांझचा वापर करण्यात आला आहे.

फ्रेंचच्या ब्रनो केटालानो या आर्टिस्टने बनविलेल्या या स्टॅच्यूमधून कठोर परिश्रमाचे दर्शन घडते. यात एक व्यक्ती हातात ब्रीफकेस घेऊन कामासाठी निघाला आहे. हा स्टॅच्यू दिसायला अर्धवट वाटतो. तसेच यात व्यक्तीचे सर्व पार्ट्स दाखविण्यात आले नसून, हेच या स्टॅच्यूचे वेगळेपण आहे.

पोलंडच्या व्रॉस्लाच्या सर्वात व्यस्त परिसरात बनवलेले हे स्कल्पचर चालत्या लोकांचा एक समूह आहे. यात एक यात्री जमीन अडकला आहे. त्यामागे अनेक जुन्या गोष्टी जुडलेल्या आहेत.

टेक्सासमध्ये उभारेल्या या स्कल्पचरला 1992 मध्ये बनविण्यात आले आहे. यात 3 वासरू घोड्यांच्या पाठीवर बसलेले आहेत आणि 70 बछडे आहेत. दलासच्या 4 एकर परिसरात पसरलेले या ब्रांझच्या स्कल्पचरची काहीच तोड नाही. 

लंडनच्या टेट मॉडर्नमध्ये बनलेल्या या मोठ्या कोळ्याचे स्कल्पचरला 1999 मध्ये बनवले होते. ब्रांझ, स्टील आणि मार्बलपासून या कोळीची निर्मिती करण्यात आली आहे.