Whats new

विजेंदर बनला प्रोफेशनल बॉक्सर

Vijender Singh  

आलिम्पिक कांस्य विजेता भारतीय बॉक्सर विजेंदरसिंग याने प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवताच भारतीय बॉक्सिंगमध्ये नवा अध्याय लिहिला गेला.

२००८ च्या बीजिंग आलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या विजेंदरने आयओएस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून क्वीन्स बेरी प्रमोशन्ससोबत बहुवर्षीय व्यावसायिक करार केला. यानुसार तो मिडलवेटमध्ये पहिल्या वर्षी किमान सहा लढती खेळेल. प्रमोटर्स मिळाल्यास आपण व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पाय रोवू, अशी इच्छा विजेंदरने फ्लायड मेवेदर आणि मॅनी पॅकियावो यांच्यातील लढतीनंतर व्यक्त केली होती. आज एका मोठ्या पत्रकार परिषदेत त्याने या आशयाच्या करारावर स्वाक्षरी केली. हरियाणातील भिवानी गावात जन्मलेला ३९ वर्षांचा विजेंदर यापुढे मॅन्चेस्टर शहरात वास्तव्यास असेल.

विजेंदरने २००६ आणि २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, २००६ च्या आशियाडमध्ये कांस्य, २००८ च्या बीजिंग आलिम्पिकमध्ये कांस्य आणि २००९ च्या विश्व हौशी चॅम्पियनशिप, तसेच २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २००९ साली मिडलवेट गटात तो विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला.