Whats new

PSI/STI/ASST. पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम

PSI/STI/ASST पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

पूर्व परीक्षा स्वरूप :

पूर्व परीक्षा    –     100 प्रश्न

एकूण गुण    –     100 गुण

दर्जा            –     पदवी

माध्यम       –     मराठी व इंग्रजी

कालावधी     –     एक तास

स्वरूप         –     वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

सामान्य क्षमता चाचणी

या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.

 1. 1. चालू घडामोडी :
  जागतिक तसेच भारतातील
 2. 2. नागरिकशास्त्र :
  भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
 3. 3. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
 4. 4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) :
  पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांशरेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, उपघटकांचा समावेश असेल. नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
 5. 5. अर्थव्यवस्था :
  भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
 6. 6. सामान्य विज्ञान :
  भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झूलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन)
 7. 7. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित :

 

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम व मार्गदर्शन

मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता खालीलपैकी कोणत्या घटकावर जास्तीत जास्त भर द्यावा म्हणजे स्कोरिंग वाढेल, हे ध्यानात येईल. याविषयी सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

 1. 1. चालू घडामोडी :
  यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, नियुक्त्या, बक्षिसे व पारितोषिके, सन्मान इत्यादी घटकांचा समावेश करता येईल. याकरिता वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, साप्ताहिके, मासिके इत्यादी प्रसार माध्यमांचा उपयोग करावा. तसेच नाथे प्रकाशनाचे
  'चालू घडामोडी' हे पुस्तक वाचावे. तसेच साप्ताहिक 'रोजगार नोकरी संदर्भ'तही वेळोवेळी चालू घडामोडी विषयी माहिती दिली जाते. त्याचाही सविस्तर अभ्यास करावा.
 2. 2. नागरिकशास्त्र :
  यामध्ये राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, परिशिष्टे, महत्त्वाची कलमे, संसद, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायसंस्था, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची कार्ये व अधिकार यावर प्रश्न विचारल्या जातात. याकरिता नाथे प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केलेले 'भारतीय राज्यघटना व पंयायतराज' हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याशिवाय संबंधित परीक्षेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुलकी व पोलीस प्रशासन या भागावर प्रश्न विचारण्यात येतात.
 3. 3. आधुनिक भारताचा विशेषत:महाराष्ट्राचा इतिहास :
  1857 पासून तर 1947 पर्यंत सर्व ऐतिहासिक म्हणजे भारतातील गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय यांचा कार्यकाळ व त्यांच्या कार्यकाळातील घटना. याकरिता प्रा. संजय नाथे लिखित 'आधुनिक भारताचा इतिहास' हे पुस्तक वाचावे. या विषयाचा अभ्यास करताना 1857 च्या उठावाची कारणे वगैरे, म्हणजेच थोडे मागे जावे लागेल. मात्र जास्तीत जास्त भर 1857 नंतर झालेल्या घटनांवरच द्यावा. अलीकडे आयोगाने महाराष्ट्रातील इतिहासावर प्रश्न विचारणे सुरू केले आहे. त्या प्रश्नाचे स्वरूप प्रस्तुत प्रश्नपत्रिकेत अभ्यासता येईल. त्यासाठी उमेदवाराने अभ्यासक्रमाला अनुसरून बी.ए. ची पुस्तके अभ्यासावीत.
 4. 4. भूगोल :(महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह)
  भूगोल या विषयाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर द्यावा. शिवाय, पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश – रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान व तापमान, प्रमुख पिके, प्रमुख शहरे, नद्या, उद्योग – धंदे, इत्यादी उपघटकांचाही सविस्तर अभ्यास करावा. भूगोलाचा अभ्यास करताना जग, भारत तसेच महाराष्ट्राचा नकाशा समोर ठेवावा. त्यामुळे एकदा वाचलेले किंवा पाहिलेले चिरकाल स्मरणात राहील.
  भूगोलाचा अभ्यास करताना 8 वी, 9 वी, 10 वी ची भूगोलाची पुस्तके तसेच पर्जन्यमान, प्रमुख पिके व उद्योगधंदे हे बदलणारे घटक असल्यामुळे चालू वर्षाचे नाथे प्रकाशनाचे 'भूगोल प्रश्नपत्रिका' हे पुस्तक वाचावे. यासाठी प्रा. संजय नाथे लिखित 'कला शाखा घटक' हे पुस्तकही अत्यंत उपयुक्त ठरेल.
 5. 5. अर्थव्यवस्था :
  अर्थविषयक घटकांची व्याप्ती फार मोठी आहे. मात्र PSI/STI/ASST या पदांकरिता अभ्यास करताना जास्तीत जास्त पंचवार्षिक योजनावरच भर द्यावा. कारण मागील वर्षीचे पेपर पाहिले असता जवळपास प्रश्न पंचवार्षिक योजनेवरच विचारलेले आढळतात. मात्र त्याकरिता नियोजन मंडळाच्या स्थापनेपासून तर बाराव्या पंचवार्षिक योजनापर्यंत पूर्ण अभ्यास करावा. या विषयाचा अभ्यास उमेदवाराने तुलनात्मक करावा.
 6. 6. सामान्य विज्ञान :
  यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जातात. याकरिता 8,9,10 वी ची पुस्तके अत्यंत उपयोगी ठरतील. तसेच नाथे प्रकाशनाचे 'स्पर्धा परीक्षा सामान्य विज्ञान' हे पुस्तकही उपयुक्त ठरेल.
  विद्यार्थी या विषयाच्या घोकंमपट्टीवर भऱ देतात. परिणामी ऐन वेळेवर गोंधळ होतो. अचूक उत्तर कोणते विद्यार्थी ओळखू शकत नाही. तसेच घोकंमपट्टी करून अभ्यासलेला प्रश्न
  दुस-या पद्धतीने विचारला गेला तरी विद्यार्थी गोंधळतो. त्यामुळे या विषयाचा सर्वंकष अभ्यास करावा. दैनंदिन विज्ञानावर विशेष भर द्यावा.
 7. 7. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित :
  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक प्रमाण, गुणोत्तर, शेकडेवारी इत्यादी धड्यांवर येथे प्रश्न विचारण्यात येतात. याकरिता जास्तीत जास्त उदाहरणे सोडवून पाहण्याचा सराव करावा. या विषयाला घाबरण्याचे काही कारण नाही. शेवटी हाच विषय पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊन विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरवू शकतो. यासाठी प्रा. संजय नाथे लिखित 'सुलभ अंकगणित' हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. तसेच बुद्धिमापन या विषयाच्या संपूर्ण अभ्यासासाठी नाथे प्रकाशनाचेच 'सुलभ बुद्धिमत्ता चाचणी' हे पुस्तक अभ्यासावे.

विक्रीकर निरीक्षक (STI) गट-ब (अराजपत्रित)

मुख्य परीक्षा स्वरूप

 

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                                     एकूण गुण : 200

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे

पेपर क्र.           विषय    गुण       प्रश्नसंख्या       दर्जा      माध्यम   कालावधी

1    मराठी           60       60         मराठी – बारावी    मराठी     एक तास

     इंग्रजी           40       40         इंग्रजी – पदवी     इंग्रजी

2.   सामान्य ज्ञान,    100      100        पदवी            मराठी व   एक तास

     बुद्धिमापन व                                          इंग्रजी

     विषयाचे ज्ञान

STI मुख्य परीक्षेसाठी पेपर क्र. 1 – 100 गुण व पेपर क्र. 2 – 100 गुण अशी एकूण 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे नेमणुकीसाठी शिफारस करण्यात येईल. 'मुलाखत घेतली जाणार नाही.' त्याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक १ : इंग्रजी व मराठी

 

मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उता-यांवरील प्रश्नांची उत्‍तरे

इंग्रजी : Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and Phrases & their meaning and comprehension of passage.

पेपर क्रमांक २ : सामान्य ज्ञान, बुद्घिमापन व विषयाचे ज्ञान

या विषयामध्ये खालील घटक/उपघटकांचा समावेश असेल.

(१)    चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील

(२)  बुद्घिमत्ता चाचणी : अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णांक तसेच बुद्ध्यांक मापनाशी संबंधित प्रश्न.

महाराष्ट्राचा भूगोल : महाराष्ट्र्राचा रचनात्मक (Physical), भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती -वने खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

(४) महाराष्ट्राचा इतिहास:

      सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५- १८४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

(५) भारतीय राज्यघटना :

     घटना कशी तयार झाली आणि घटने'या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची  महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र  न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ-Role, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व Role, विधि समित्या.

(६) माहिती अधिकार अधिनियम : २००५   

(७) संगणक व माहिती तंत्रज्ञान :

     आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी,सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न, त्यांचे भवितव्य. VAT व GST व त्यात संगणकीकरणाचे फायदे.

(८) नियोजन :

     प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफल, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटना दुरूस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रिय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.

(९) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास :

     पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ-जसे ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर, इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार) रेडिओ, टी.व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयाचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.

(१०) आर्थिक सुधारणा व कायदे :

     पाश्र्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या. GST विक्रीकर, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे/ नियम.

(११) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ :

     जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी  भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ,  FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणा-या संस्था, IMF जागतक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटींग.

(१२) सार्वजनिक वित्त व्यवस्था :

     महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र वा राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील कर-सुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा VAT सार्वजनिक  ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम,  भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व

राज्यस्तरावरील आढावा.

 

 

 

 

 

 

 

 

सहायक, (ASST) गट-ब (अराजपत्रित)

मुख्य परीक्षा स्वरूप

 

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                  एकूण गुण : २००

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे

 

पेपर क्र. विषय        गुण    प्रश्नसंख्या    दर्जा         माध्यम   कालावधी

१        मराठी         ६०      ६०          मराठी-बारावी    मराठी     एक तास

          इंग्रजी         ४०     ४०          इंग्रजी-पदवी     इंग्रजी        

२        सामान्य ज्ञान,  

          बुद्घिमापन व    १००     १००         पदवी          मराठी व   एक तास

          विषयाचे ज्ञान                                    इंग्रजी        

 

     सहायक (ASSISTANT) मुख्य परीक्षेसाठी पेपर क्र.१ - १०० गुण व पेपर क्र. २ - १०० गुण अशी एकूण २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या गुणांच्या आधारे नेमणुकीसाठी शिफारस करण्यात येईल. मुलाखत घेतली जाणार नाही’. त्याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे....

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक १ : इंग्रजी व मराठी

मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उता-यांवरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी : Common Vocabulary, Sentence Structure, Grammer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

पेपर क्रमांक २ : सामान्य ज्ञान, बुद्घिमापन व विषयाचे ज्ञान

या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

 

(१) चालू घडामोडी :

     जागतिक· तसेच भारतातील

(२) बुद्घिमत्ता चाचणी :

     अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णांक तसेच बुद्ध्यांक मापनाशी संबंधित प्रश्न.

(३) महाराष्ट्राचा भूगोल :

     महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल-लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

(४) महाराष्ट्राचा इतिहास :

     सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन  चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

(५) भारतीय राज्यघटना :

     घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये,  केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क्‍ व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – भूमिका, अधिकार व कार्ये, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधिसमित्या.

(६) माहितीचा अधिकार अधिनियम-२००५:

(७) संगणक व माहिती तंत्रज्ञान :

     आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (Case Law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.

(८) राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्ये) केंद्र सरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)

(९) जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन

(१०) न्यायमंडळ :

     न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ - कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये - लोकपाल, लोकायुक्त आणि  लोक  न्यायालय सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. 

 

 

 

 

 

 

 

 

पोलीस उपनिरीक्षक (PSI), गट-ब (अराजपत्रित)

मुख्य परीक्षा स्वरूप

 

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी                  एकूण गुण : २००

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे

पेपर क्र. विषय       गुण    प्रश्नसंख्या    दर्जा         माध्यम   कालावधी

१       मराठी        ६०      ६०          मराठी-बारावी    मराठी     एक तास

        इंग्रजी         ४०     ४०          इंग्रजी-पदवी     इंग्रजी

२      सामान्य ज्ञान,

        बु‌द्घिमापन व   १००     १००         पदवी          मराठी व   एक तास

        विषयाचे ज्ञान                                    इंग्रजी    

 

 पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेसाठी पेपर क्र. १-१०० गुण व पेपर क्र. २-१०० गुण अशी एकूण २०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाईल. तसेच शारीरिक चाचणी १०० गुण व मुलाखत ४० गुण असतील.

त्याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे ...

 

अभ्यासक्रम

पेपर क्र. 1 : इंग्रजी व मराठी

 

मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उता-यांवरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी : Common Vocabulary, Sentence Structure, Grimmer, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

 

 

पेपर क्रमांक २ : सामान्य ज्ञान, बुद्घिमापन व विषयाचे ज्ञान

या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

 

(१) चालू घडामोडी :

   जागतिक· तसेच भारतातील

(२) बुद्घिमत्ता चाचणी :

   अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णांक तसेच बुद्ध्यांक मापनाशी संबंधित प्रश्न.

(३) महाराष्ट्राचा भूगोल :

   महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती-वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल-लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.

(४) महाराष्ट्राचा इतिहास :

   सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन  चळवळी, राष्ट्रीय चळवळी.

(५) भारतीय राज्यघटना :

   घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क्‍ व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका,

(६) माहितीचा अधिकार अधिनियम-२००५:

(७) संगणक व माहिती तंत्रज्ञान :

   आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (Case Law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी.

(8) मानवी हक्क व जबाबदा-या :

   संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

(9) भारतीय दंड संहिता :

   सदर अभ्यासक्रमासंदर्भात काही उमेदवारांकडून पृच्छा झाल्यावरून असे स्पष्ट करण्यात येते की, सुधारित अभ्यासक्रमामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांपैकी भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय पुरावा कायदा व तीन घटकांच्या प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तरे देऊ शकेल या विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे.

(10) मुंबई पोलीस कायदा :

(11) फौजदारी प्रक्रिया संहिता :  1973 :

(12) भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)

 

शारीरिक चाचणी (100 गुण)

लेखी परीक्षेत गुणानुक्रमात येणा-या उमेदवारांनाच शारीरिक चाचणीसाठी पाचारण करण्यात येईल. शारीरिक चाचणीच्या माहितीसाठी www.mpsc.gov.in ही वेबसाईट पहावी.

मुलाखत (40 गुण)

शारीरिक चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत मध्ये मिळालेल्या गुणांनुसार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट प्रमाणे निवड केली जाईल.

 

Free Download -